Press "Enter" to skip to content

राज्य बदलले तरी वाहन नंबर तोच राहणार

बीएच सीरीज येणार ; पनवेलमध्ये बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीनिमित्त राज्ये बदलावी लागतात, त्यांना बीएच नोंदणीचा चांगला पर्याय असणार आहे. जर बीएच नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली तर दुसऱ्या राज्यात जाताना वाहन मालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही.

यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेलेल्या वाहन मालकांना वाहनांची नव्याने नोंदणी करावी लागत होती. बीएच सिरीज असणारे वाहन घेऊन दुसऱ्या राज्यात गेलो तर 30 दिवसाच्या आत फॉर्म नंबर ३३ ऑनलाईन भरून त्या आरटीओला कळवावं लागते.           

केंद्राने सर्व वाहनांमध्ये भारत सीरिज (Bharat series)  किंवा ‘बीएच’ (BH)  नावाने नवीन वाहन नोंदणी चिन्ह सादर केले आहे. नवीन बीएच सीरीज वाहनांना नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची आवश्यकता नाही आणि ती देशभरात वैध असेल. ही सुविधा संरक्षण कर्मचारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक आधारावर उपलब्ध असेल. चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांचे कर्मचारीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

याचा सर्वात मोठा फायदा नोकरीसाठी परराज्यात स्थलांतर करणाऱ्यांना होणार आहे. बीएच सीरीज अंतर्गत मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा 4, 6, 8 वर्षांसाठी आकारला जाईल. खाजगी वाहनांना नवीन राज्यात स्थलांतरित केल्यावर या योजनेमुळे मोफत प्रवास करता येईल. चौदाव्या वर्षानंतर मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल जो त्या वाहनासाठी पूर्वी गोळा केलेल्या रकमेच्या निम्मा असेल. नवीन सिरीज जुन्या वाहनांना लागू होणार नसली तरीदेखील नवीन वाहने घेणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे.

1)  नोंदणीला सुरुवातपनवेल प्रादेशिक परिवहन विभागात बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात झालेली आहे. 

2) असे असणार नंबर्सBH नोंदणीचे स्वरूप YY BH 4144 XX YY असे ठेवले आहे. यातील YY म्हणजे फर्स्ट रजिस्ट्रेशन. या वर्षातील गाडी असेल तर  21BH1234MH असा गाडी नंबर असू शकतो. अर्थात ही सुविधा वैकल्पिक आहे. या वर्षातील गाडी असेल तर  21BH1234MH असा गाडी नंबर असू शकतो. 

 3) टॅक्स कसा भरावाहे वाहन घेतल्यानंतर कमीत कमी दोन वर्षाचा टॅक्स भरणे आवश्यक असते. तो टॅक्स संपल्यानंतर पुढील दोन वर्षाचा टॅक्स सात दिवसाच्या आत भरणे आवश्यक आहे, अन्यथा शंभर रुपये प्रत्येक दिवसाला दंड आकारला जातो. बी एच सीरीज ही मोटर कार आणि दुचाकी या दोन वाहनांसाठी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.