Press "Enter" to skip to content

मुलांना कोव्हॅक्सिन लस

गुड न्यूज : 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना दिली जाणार कोव्हॅक्सिन लस

सिटी बेल | नवी दिल्ली |

लहान मुलांच्या पालकांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin) ही कोरोना प्रतिबंधात्मक लस आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना दिली जाणार आहे.

या लसीला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना प्रौढांप्रमाणे Covaxin लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा मुलांवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांच्या मते, ज्या मुलांना दमा वगैरे समस्या आहेत त्यांचे लसीकरण हे आधी करण्यात येऊ शकते. ही लस सरकारी ठिकाणी मोफत दिली जाईल.

मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी दिल्याने ही खूप दिलासा देणारी बातमी ठरली आहे. त्यामुळे पालकवर्गाची चिंता बर्याच प्रमाणात कमी होईल. कारण कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक त्रास होईल असे म्हटले जात आहे. परंतु जर त्यापूर्वी मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळू लागली तर संसर्ग कमी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच आता मुलांच्या शाळा सुरू झाल्यानंतर लस उपलब्ध झाली तर पालकांची चिंता दूर होणार आहे.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.