“दाल भात लोन्चा कोन नाय कोन्चा” चित्रपटात विकृत सीन ! महेश मांजरेकर यांना राज्य महिला आयोगाची नोटीस
सिटी बेल | मुंबई | अजय शिवकर |
प्रसिद्ध सिने नट व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपट “दाल भात लोन्चा कोन नाय कोन्चा” याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यात अतिशय विकृत व आपत्तीजनक सिन दाखविण्यात आली आहेत.
त्यावर महाराष्ट्रातील संतप्त पालकांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार राज्य महिला आयोगाने देखील महेश मांजरेकर यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.
सध्या शाळेय शिक्षण आॕनलाईन म्हणजे मोबाईलच्या माध्यमातूनच होते व या चित्रपटाचा त्यांच्यावर वाईट परिणाम होईल अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटासाठी रिव्ह्यु कमिटी नेमून पुन्हा परिक्षण व्हावे ! अशी मागणी करण्यात आली आहे.
Be First to Comment