
पनवेल, दि.१३ (वार्ताहर) : देवद येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जयंत पाखरे तसेच कामोठे येथील युवा नेते सुनील गोवारी यांच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या ‘शिवसेना आरती संग्रह’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात करण्यात आले. धार्मिक परंपरेसोबतच शिवसेनेचे विचार, कार्य आणि संघटनात्मक भूमिका घराघरात पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे कौतुक करताना मा. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी, “शिवसेना आरती संग्रहाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य घराघरात पोहोचविण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील व भरत पाटील, महानगरप्रमुख समाधान काशीद, पनवेल महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या गटनेत्या लीना ताई गरड, माजी जिल्हाप्रमुख शिरीष बुटाला, विभागप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यतीन देशमुख, बालेश भोजने, कैलास पाटील, रामदास गोवारी, विश्वास पेटकर तसेच नगरसेविका आर्या जाधव आणि महिला आघाडीच्या ज्योती मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यामुळे देवद परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.



Be First to Comment