Press "Enter" to skip to content

रायगडात बाल विवाहाची घटना

अल्पवयीन विवाहित सात महिन्याच्या गर्भवतीचा प्रसूती उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू : पाली येथे पाच जणांवर गुन्हे दाखल

सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत |

रायगड़ जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे विकासवाडी पो. परळी येथील एका अल्पवयीन विवाहित गर्भवती (वय 14) हिला आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे. अल्पवयीन गर्भवतीला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाच जणांवर पाली पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यासंदर्भात सहाय्यक फौंजदार मोहन काळूराम म्हात्रे यांच्या फिर्यादीनुसार
सविस्तर हकीकत अशी की सदर पीडितेचा विवाह फेब्रुवारी सन 2020 मध्ये सोनू पांडू पवार (55), अलका मारुती हिलम (48) यांनी सागर पवार(18 ) या तरुणाशी संगनमताने लावून दिला होता. सदर पीडित 14 वर्षाची आहे, व आपण तिचे पती असून ती आपल्या अभिरक्षेत आहे हे माहीत असूनदेखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन तिला पती सागर पवार याने गर्भवती केली. सदर पीडित तरुणी सात महिन्याची गर्भवती होती.

दरम्यान प्रसूतीसाठी अलिबाग सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाली पोलीस स्थानकात गु.र.नंबर 06/2022 भा द वि स कलम 376(2), (जे )(के), 376(3)सह बालकांचे लैगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6, 10, 21,सह बालविवाह अधिनियम 2006 चे कलम 10 , 11 प्रमाणे सागर पवार, (18) सोनू पांडू पवार (55) , भुरी सोनू पवार(55), मारुती गोपाळ हिलम(52), अलका मारुती हिलम (48)यांच्यावर पाली पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर प्रकरणाची खबर रजिस्टरी दाखल करून पुढील तपास विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली म .स. पो. नि तृप्ती बोराटे करीत आहेत.

बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, बालविवाहाची शिकार झालेले अनेक निष्पाप मुलींना आपले प्राण गमवावे लागत आहे, वधू व वर यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने कोणतेही बालविवाह सारखे गुह्याचे पाऊल उचलू नये, यामध्ये आपले अनमोल जीव गमावले जातात. यासाठी समाजात प्रबोधन व जनजागृती करण्यावर भर दिल्यास अल्पवयीन विवाह पद्धतीला आळा बसेल, व बालकांचे लैगिक शोषण होण्यापासून रोखले जाईल असे आवाहन पाली पोलिसांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.