Press "Enter" to skip to content

कोरोना चे औषध आले हो अंगणी…

मोलनुपिरावीर या औषधाची जोरदार विक्री सुरू : कोरोना वर प्रभावी असल्याचा एनटीएजीआय चा दावा

सिटी बेल | Exclusive | मंदार दोंदे |

कोरोनाच्या मायक्रॉन या नव्या व्हेरीइंट चा प्रभाव वाढत चालला आहे. त्यातच कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या मोलनुपिरावीर या औषधाची जोरदार विक्री सुरु आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) यांनी या औषधाच्या वापराविषयी काही निर्देश जारी केले आहेत.

कारोनाप्रबंधक म्हणून हे औषध ओळखले जाते. ही लस नसून एक गोळी आहे.
गेल्या वर्षी या गोळीच्या वापराची परवानगी आपत्कालीन परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने दिली होती.

ज्या कोरोना बाधितांची ऑक्सिजनची पातळी 93 टक्‍क्‍यांहून कमी आहे आणि त्यांच्यात कॉरोना लागण झाल्याची गंभीर लक्षणे आहेत त्यांनाच मोलनुपिराविर दिले जाते.(रुग्णाची लागण लक्षणांवरून समजावी, rt-pcr ही फक्त तीस टक्के सक्षम असणारी चाचणी आहे त्यामुळे rt-pcr चाचणीचा रिपोर्ट पूर्णपणे विश्वसनीय नसतो) हे औषध सर्दी-पडसे असलेल्यांसाठी तयार केले आहे.

ओमायक्रोन व्हेरियंट वर देखील हे औषध प्रभावी ठरत असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा आहे. मोलनुपिराविर हे औषध रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून किंवा आयसीयूमध्ये दाखल होण्यापासून वाचवते.
अतिगंभीर किंवा खूप जास्त लक्षणे असल्यावरच या औषधाचा वापर करावा, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा वापर करणे शक्यतो टाळावे असे एन टी ए जी आय चे प्रमुख डॉक्टर अरोरा यांचे म्हणणे आहे.

ही कॅप्सुल नेमके काय करते ?

ही कैप्सूल ओमायक्रॉनच्य जनुकीय संकेतांत बदल घडवून त्याला नामोहरम करते.

युरोप आणि अमेरिकेतही या औषधाचा वापर केला जातो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.