
पेण , ता. १६ (वार्ताहर) : पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागच्या आठ दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने बाईक चोरी केल्याची घटना घडली असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबु वय ४२ रा. मराठा आळी, नागोठणे ता. रोहा यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाजी मंडई येथील निधी ट्रेडर्स दुकाना समोर लावलेली एक लाल रंगाची होंडा कंपनीची ॲक्टीव्हा स्कुटी एम.एच.०६,सी.बी १०८४ हि बाईक सदर चोरट्याने दि. ९ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास स्वतःच्या फायदया करीता चोरी करून नेली होती याबाबतची तक्रार फिर्यादी याने पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे हलवली आसता सदर आरोपी मोटरसायकल घेऊन नागोठणे बाजूकडे गेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आला असता आरोपी राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबु यास दि.१३ मार्च रोजी अटक करण्यात आली.
याच दरम्यान त्याच्याकडे अधिक तपास केला असता आणखी एक बाईक चोरल्याचे त्यांनी कबूल केले याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पेण पोलीस करत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सुचनाप्रमाणे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी यशस्वी केली.





Be First to Comment