
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट मध्ये सादर होणार
मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील )
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर दिले जाणार आहे, याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी आपल्याला दिली आहे.त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच राष्ट्रीय नेते दि.बा. पाटील यांचे नाव लागणार आहे अशी माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव देण्यात यावे या संदर्भात आपण अनेक वेळा संसदेत मागणी केली आहे. मागच्या आठवड्यात आपण स्वतः केंद्रीय उड्डाण मंत्री नायडू यांची भेट घेतली असता अनेक वर्षांपासून कॅबिनेटमध्ये न आलेला प्रस्ताव आता लवकरच कॅबिनेटमध्ये सादर होणार असून याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही आपल्याला केंद्रीय उड्डाण मंत्री नायडू यांनी दिली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळणार असून हा येथील स्थानिक भूमिपुत्रांचा विजय असल्याचे मत यावेळी खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.





Be First to Comment