आजीबाईना १०६ व्या वर्षी दुधाचे दात आले परत ; आजींना चा पाळण्यात घालून मोठया थाटात झालं बारस..
सिटी बेल ∆ सोलापूर – अक्कलकोट ∆
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे एक अनोख कार्यक्रम पाहायला मिळाला. १०६ वर्षाच्या आजीबाईना कुटुंबीयांनी पाळण्यात घालून त्यांचं नामकरण केलं.निमित्त होतं आजीबाईना १०६ व्या वर्षी दुधाचे दात परत आले.
१०६ व्या वर्षी दुधाचे दात परत आल्याने घरातील महिलांनी पाळणा सजवून,लहान बाळाला प्रमाणे आजीबाईना त्या पाळण्यात बसवून बार्स केलं. १०६ वर्षाच्या धानव्वा उडगे यांना दुधाचे दात परत आल्याने चपळगाव येथे कौतुकाचा विषय झाला आहे.
Be First to Comment