Press "Enter" to skip to content

खारघरच्या ग्लोमॅक्स मॉलला मिळणार नवीन ओळख

“एन्जॉय सिटी मॉल” लवकरच… नागरिकांच्या भेटीला

एन्जॉय सिटी मॉल च्या लोगोचे दिमाखदार अनावरण

सिटी बेल ∆ खारघर ∆

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला खारघर येथील बहुचर्चित ग्लोमॅक्स मॉल आता फिनिक्स भरारी घेणार आहे. एन्जॉय सिटी मॉल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आता या मॉलची धुरा हाती घेतली असून लवकरच बंद अवस्थेत असलेला हा मॉल पुन्हा नव्याने फिनिक्स भरारी घेणार आहे. आज एन्जॉय सिटी मॉल च्या लोगो अनावरणाचा दिमाखदार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी बोलताना एन्जॉय सिटी मॉल प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर वैभव सोनटक्के म्हणाले की, खारघर मध्ये अगदी महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या मॉल ची दुरावस्था आम्ही गेले अनेक वर्ष पाहत होतो. वास्तविक पाहता या मॉल चे ठिकाण अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. बांधण्यात आलेली वास्तू देखील दिमाखदार आहे.

परंतु दुर्दैवाने हा मॉल जास्त दिवस चालू शकला नाही आणि काही कारणास्तव कालांतराने हा बंद झाला. परंतु आता आमच्या कंपनीने येथील गाळेधारकांची सोसायटी तसेच बिल्डर यांच्याशी समन्वय साधून हा मॉल सुरू करण्याचा संकल्प केला आहे. आमच्या संकल्पपूर्तीला सुरुवात देखील झाली आहे. लवकरच या ठिकाणी एन्जॉय को वर्किंग स्पेस, कॉर्पोरेट क्लिनिक, कम्युनिटी किचन या नवीन संकल्पनां सोबतच मोठमोठे ब्रँड ची शोरूम्स आपणास पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर किड्स झोन, मूव्ही थेटर, फूड कोर्ट देखील असणार आहे. खारघर सह संपूर्ण नवी मुंबई पनवेल तसेच रायगड वासियांना देखील एन्जॉय सिटी मॉल मध्ये येण्याचा मोह आवरणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

याप्रसंगी एन्जॉय सिटी मॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर वैभव सोनटक्के, सतिंदर सिंग, विवेक पाटील, मंदार दोंदे, मॉलमधील गाळेधारक तसेच सोसायटीचे चेअरमन मौसमी देबराॅय, मॅनेजिंग डायरेक्टर उमा गोपीकृष्णन, डायरेक्टर फायनान्स संदीप कपूर, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर ममता झा, जॉईंट डायरेक्टर फायनान्स मावजीभाई पटेल, मेंबर ऑफ बोर्ड पाऊल स्वामी नादर, सावळाराम गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.