मोठी बातमी ! पॅन-आधार लिंक नसेल तर दंड होणार…
सिटी बेल • मुंबई •
तुम्ही जर पॅन – आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे लवकरच पॅन-आधारला लिंक करून घ्या.
1 एप्रिलनंतर पॅन-आधार कार्डला लिंक करायचं असेल तर तुम्हाला 500 रुपये मोजावे लागतील. हा दंड पुढील तीन महिने असेल.
जूननंतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1 हजार रुपये मोजावे लागतील. त्यामुळे हा दंड भरण्यापेक्षा दोन मिनिटांत तुम्ही आधार लिंक करून घ्या.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ही डेडलाईन वाढवली जाण्याची शक्यता फारच कमी आहे.
📍 Pan-Aadhar ऑनलाईन लिंक करा : आधार पॅनला SMS द्वारे लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS पाठवा. याचा एक फॉरमॅट निश्चित केला आहे. यूआयडीएपीएन (12 अंकी-आधार क्रमांक) स्पेस (10 अंकी पॅन नंबर) लिहून SMS करावा. एखाद्याचा आधार कार्ड नंबर ABCD12345678 आहे व पॅन कार्ड क्रमांक XYZ12345645 आहे. तर SMSकरताना हा फॉरमॅट “ABCD12345678 WXYZ123456” असा असेल. तसेच https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर क्लिक करून आधार पॅनला लिंक करू शकता.

Be First to Comment