सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी माजी मंत्री व आमदार रवीशेठ पाटील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांना जामीन मंजूर
सिटी बेल • पेण • प्रतिनिधी •
पेण मध्ये घडलेल्या एका पोस्को गुन्ह्यातील प्रत सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्याबाबत गुन्हा दाखल झाला त्यानुसार अलिबाग सत्र न्यायालयाने निकाल जाहीर करून त्यात पोस्ट व्हायरल करणारे भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटिलांसह अन्य दोघांना न्यायालयाने तात्काळ जामीन मंजूर केला व त्यांची सुटका केली.
सविस्तर घटना अशी की, पेण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या सह दोघांना पोस्को गुन्ह्यातील प्रत सोशल मीडियावर व्हायरल केल्या बाबत अलिबाग कोर्टाने तंत्रज्ञान अधिनियमन अंतर्गत तीन महिने कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र वैकुंठ पाटील यांनी सुनावणी च्या दिवशीच २८ फेब्रुवारी रोजी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची तात्काळ जामिनावर सुटका करण्यात आली.
दरम्यान या प्रकरणाबाबत वैकुंठ पाटील यांनी अलिबाग न्यायालयाच्या निकालाचे सन्मान करीत आपण याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.व यात राजकीय खेळी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Be First to Comment