राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांना सहा महिन्यांची शिक्षा
पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची प्रथम खबर प्रत व पीडितांचे नाव सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या पुत्रासह दोघांना सहा महिन्यांची शिक्षा
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
पेण विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार रवींद्र पाटील यांचे पुत्र तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी गटनेते वैकुंठ पाटील यांनी पोस्को गुन्ह्यातील एफआरए सोशल मीडियावर प्रसारित केले असल्याने चांगलेच महागात पडले आहे. तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्ग क्रमांक एक शईदा शेख यांनी 28 फेब्रुवारी2022रोजी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.वैकुंठ पाटील आणि त्यांच्या दोन सहकारी यांना सहा महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे.
पेण येथील पोलीस ठाण्यात 27 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील वैकुंठ रवींद्र पाटील,नागेश वसंत पाठारे,विवेक वसंत पवार यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी मधील युवा शक्ती ग्रुपवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पेण पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 18/2018,भा.द.वि. 5व6या गुन्ह्याची पोलीस ठाण्याकडील सी.सी.टी.एन.एस.वर घेतलेल्या खबरेमध्ये पीडित मुलीचे नाव व तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जशीच्या तशी माहिती कायद्यामध्ये प्रतिबंध असताना देखील व्हाट्सआपच्या माध्यमातून जशीच्या जशी प्रसारित केली.
सदरच्या मजकुर अशिशील असूनतसेच अशा प्रकारचीखबर तशीच्या तशीप्रसारित करणे ही कायद्याने प्रतिबंधित आहे हे माहीत असूनसुद्धा तिचा प्रसार केला हे न्यायालयासमोर सिद्ध झाले आहे.त्यानुसार न्यायालयाने आरोपी यांना भा.द.वी 228(अ लतसेच पोस्कोकायदा कलम23 सहमाहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 23 प्रमाणे न्यायालयाने आरोपींना दोषी पकडून सहा महिन्यांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकारणीतल फिर्यादी महिला पोलीस निरीक्षक उज्जवला भडमकर यांच्या लक्षात येताच त्यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाचा तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलद गतीने तपास पूर्ण केला.
सदर दाखल्यात शासकीय अभियोक्ता भूषण साळवी तसेच शासकीय अभियोक्ता प्रतीक्षा वडे-वारगे यांनी एकूण एकोणीस साक्षीदार तपासून युक्तिवाद केला.त्यामध्ये फिर्यादी महिला पोलीस निरीक्षक उज्जवला भडमकर,पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.क्षीरसागर यांची साक्ष मोलची ठरली.तसेच पैरवीमहिला कर्मचारी प्रियांका नागवकर,पोलीस हवालदार सचिन खैरनार,पोलीस शिपाई पी. व्ही.कारखीले यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
Be First to Comment