खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडल्या केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे एन.एस.आय.सी.टी (डी. पी वर्ल्ड) पोर्ट मधून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या समस्या
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण मध्ये असलेल्या जे.एन.पी.टी बंदरांतर्गत असलेल्या भारतातील पहिल्या प्रायव्हेट पोर्ट एन.एस.आय.सी.टी (डी. पी वर्ल्ड) पोर्ट मधील सेवानिवृत्त कामगारांच्या विविध समस्यान बाबत केंद्रीय जल परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे, कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत परिवहन भवन, दिल्ली येथे बैठक झाली.
एन.एस.आय.सी.टी (डी. पी वर्ल्ड) पोर्ट मधील सेवानिवृत्त कर्मचारी हे सदर पोर्ट व्यस्थापनाच्या मनमानी कारभार व हुकूमशाही मुळे हक्काच्या ६.९.१ ह्या अटीचे काटेकोर पालन न झाल्यामुळे लाचारीचे जीवन जगत असून त्याची दखल श्रीरंग आप्पा बारणे यांनी घेतली व त्यासंदर्भात सविस्तर निवेदन केंद्रीय जल परिवहन मंत्री माननीय श्री. सर्बानंद सोनोवाल यांना दिले आहे.
या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व सध्याच्या परिस्थितीची माहिती मंत्री महोदयांना देण्यात आली, या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मंत्री महोदयांनी सुचित केले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासमवेत कामगार नेते महेंद्र सावंत, करंजा मच्छिमार सहकारी सोसायटी संचालक हेमंत गौरीकर व एन.एस.आय.सी.टी (डी. पी वर्ल्ड) पोर्ट सेवानिवृत्त कामगारांचे नेते धनराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर समस्या बाबत गप्प न बसता आता एन.एस.आय.सी.टी (डी. पी वर्ल्ड) पोर्ट मधील सेवानिवृत्त कामगार मयुरेश पाटील व भास्कर पाटील – जासई, जि. के ठाकूर – न्हावा खाडी, दयाराम कडू – सोनारी, प्रकाश म्हात्रे – नवीन शेवा यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत व आपल्या रास्त व योग्या मागण्यांसाठी व सेवानिवृत्तीचे जीवन मनाने व अभिमानाने जगण्यासाठी संघर्ष करून हक्क मिळवण्यासाठी एकत्रित संघर्ष करणार आहेत.या समस्या बाबत आवाज उठविल्याने सर्व कामगारांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले आहेत .


























Be First to Comment