Press "Enter" to skip to content

तीन जण गंभीररित्या भाजले ; एकाचा मृत्यू

उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्यवीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात स्फोट

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

आज उरण बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्पोट झाल्याने झालेल्या स्पॉटात एका जुनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या भाजले आहेत. प्राथमिक उपचारा नंतर त्यांना अधिक उपचारासाठी नवीमुंबईत नेण्यात आले आहे.उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.

आज रविवार असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नसली तरी वायू विद्युत निर्मिती संच सुरु असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते.दुपारी 12 ते च्या 12:30 च्या सुमारास कंपनीच्या बॉयलर विभागात काम सुरु असतना बॉयलर मधीलदाब अचानकपणे वाढला त्यामुळे बॉयलरला जोडलेला बीसीसी पंम्प सदरचा दाब सहन न करू शकल्याने या पंपाचा जबरदस्त स्पोट झाला स्पोटचा आवाज जबरदस्त होता,मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या बॉयलरचे दर 25 वर्षांनी सर्वेक्षण करणे आवश्यक असता नाही संबधीत खात्याकडून तपासणी करून दाखला घेतला गेला नव्हता अशी माहिती उघड झाली आहे.

या ठिकाणी काम करीत असलेले जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील (रा.उरण डोंगरी), विष्णू पाटील (रा.बोकडवीरा) हे या झालेल्या स्फ़ोटात जबर भाजले आहेत त्यांना उपचारासाठी इंदिरागांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता प्राथमिक उपचारा नंतर त्याना अधिक उपचारासाठी दोघांना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात तर एकाला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला आहे. या स्फ़ोटा बाबत अधिक तपास सुरु आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.