कार्ला लोणावळा येथील श्री एकविरा मंदिरात १० जानेवारीस महाआरतीचे आयोजन
सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील |
आगरी -कोळी – मच्छिमार व इतर समाजाची कुलस्वामिनी कार्ला निवासिनी आई एकविरा देवी मंदिर व परिसर अनेक दशकांपासून विकास कामांपासून तसेच एकविरा भक्त -भाविकांना सुख सुविधांपासून वंचित राहिलेला आहे . श्री एकविरा गड व कार्ला लेणी परिसराला वैभव प्राप्त व्हावे तसेच पर्यटन व्यवसायाला त्वरित प्राधान्य मिळावे , मंदिराच्या मूळ बांधकामाविषयी तसेच पुरातत्व अस्तित्वासंदर्भात त्वरित सर्व पुरावे गोळा करून त्या पुराव्यांच्या आधारे नव्याने मंदिराची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी या व इतर मागण्यांकरिता शासनाने लक्ष वेधण्यासाठी आगरी -कोळी समाज व समस्त एकविरा भक्त -भाविकांच्या वतीने कार्ला लोणावळा येथील श्री एकविरा देवी मंदिरात सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता महाआरती आयोजित करण्यात आली आहे .

या आरतीस आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी , आगरी सेना नेते प्रदीपभाऊ साळवी, आगरी युवा सेना प्रमुख राहुल साळवी यांना तसेच सर्व जिल्हाप्रमुख यांना निमंत्रित केल्याचे मुंबई प्रदेश आगरी सेना अध्यक्ष जयेंद्रदादा खुणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.


























Be First to Comment