Press "Enter" to skip to content

अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद ट्रस्टची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

राज्यपालांच्या हस्ते गौरव

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्त भागातील एक हजार मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये असे एकूण पाच करोड आणि पुरग्रस्तांना आधार देण्यासाठी दहा करोड रुपये ट्रस्टच्यवतीने दहा करोड रुपये मराठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्टने मदत केल्याने त्याची दखल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेनी घेतली.याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील,राज्य ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजयमामा, चित्रपट निर्माता,लेखक, दिग्दर्शक सिकंदर सय्यद यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.मराठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.