भारतीयांचे स्वप्न झाले साकार : नीरज चोप्राने रचला इतिहास
सिटी बेल | टोक्यो |
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.
चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत आणि कांस्य पदक मिळालं.
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.
Be First to Comment