Press "Enter" to skip to content

स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’

विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती – आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

सिटी बेल ∆ खारघर ∆ प्रतिनिधी ∆

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ आयोजित करण्यात आली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खारघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती प्रविण पाटील, मॅरेथॉन पंच कमिटीचे प्रभारी सुशिल इनामदार, मोना अडवाणी आदी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना पुढे सविस्तर माहिती देताना सांगितले कि, खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी ०९ वाजता होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैय्या, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रमुख मान्यवर म्हणून उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, सुप्रसिद्ध बॉलिवूड हास्य अभिनेता राजपाल यादव, सिने अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारी, सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची हि स्पर्धा १३ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, पत्रकार गट ०२ किलोमीटर अशा १३ गटात हि स्पर्धा होणार असून २ लाख ९६ हजार रुपयांची बक्षिसे आहेत. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील पुरुष खुला गट व महिला खुला गटासाठी १०० रुपये तर उर्वरित गटांसाठी २० रुपये नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आली आणि हि प्रवेश फि सामाजिक उपक्रमासाठी वापरली जाते. तसेच शाळा व गृहसंकुल सोसायटींना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देता यावे, यासाठी त्यांना प्रवेश शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा नेहमी प्रमाणे यशस्वी करण्यासाठी आयोजन, स्वागत, प्रसिध्दी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, बक्षिस वितरण अशा विविध समित्या कार्यरत आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी सांगितले कि, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर हि स्पर्धा खारघर शहरात आयोजित करण्यात आली. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली आणि त्या अनुषंगाने या मॅरॅथॉनने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून या वर्षीच्या स्पर्धेत १७ हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग नोंदला गेला आहे, अशीही परेश ठाकूर यांनी माहिती दिली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फोर निर्भय भारत’, ‘सदभावना दौड’, ‘एक धाव पाणी बचतीसाठी’, ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’, ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’, ‘हम फिट तो इंडिया फिट’ अशी घोषवाक्य घेवून उत्कॄष्ठ आयोजनाने स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या आहेत, असे परेश ठाकूर यांनी यावेळी नमूद केले. त्याचबरोबर मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या असून प्री इवेंट च्या अनुषंगाने शनिवारी सायकलिंग स्पर्धा होणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

– बक्षिसांचा तपशिल –

पुरुष खुला गट – (रायगड जिल्हा मर्यादित ) अंतर १० किलोमीटर

प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ २२ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

महिला खुला गट -(रायगड जिल्हा मर्यादित ) अंतर १० किलोमीटर

प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ २२ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

१७ वर्षाखालील मुले गट- अंतर ०५ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

१७ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

१४ वर्षाखालील मुले गट- अंतर०५ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

१४ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

खारघर दौड – (वैयक्तिक, शालेय, सोयायटी, व इतर अशा चार गटात )- अंतर ०३ किलोमीटर

स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल व प्रमाणपत्र.

ज्येष्ठ नागरिक दौड (पुरुष गट )- अंतर ०२ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. त्याचबरोबर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

ज्येष्ठ नागरिक दौड (महिला गट )- अंतर ०२ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. त्याचबरोबर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

पत्रकार गट – अंतर ०२ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.