मानाच्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून होणार प्रारंभ
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदा नववे वर्ष आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे.
नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला.
नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शुक्रवारपासून विभागनिहाय प्रारंभ होणार आहे. त्यानुसार पुणे केंद्रावर ४ व ५ नोव्हेंबरला, सातारा केंद्र ०६ नोव्हेंबर,
रत्नागिरी ०८ नोव्हेंबर, जळगाव व नागपूर केंद्र १२ नोव्हेंबर, नाशिक १३ नोव्हेंबर, रायगड (पनवेल) १९ व २० नोव्हेंबर, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली केंद्रांची प्राथमिक फेरी २४ ते २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर अंतिम फेरी ०२ ते ०४ डिसेंबर २०२२ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
अशी आहेत पारितोषिके :
प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, आणि मानाचा अटल करंडक,
द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,
तॄतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,
चतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ एकूण दोन बक्षिसे प्रत्येकी ०५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे असून या प्रमुख बक्षिसांचे प्रायोजक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आहे.
वैयक्तीक व विशेष बक्षिसांचे प्रायोजक नील ग्रुप असून ती बक्षिसे खालीलप्रमाणे –
सर्वोत्कॄष्ठ अभिनेता( वैयक्तिक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कॄष्ठ अभिनेत्री (वैयक्तिक )
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कॄष्ठ दिग्दर्शक (वैयक्तिक )
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कॄष्ठ लेखक (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कॄष्ठ संगीत ( वैयक्तिक )
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कॄष्ठ नेपथ्य ( वैयक्तिक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कॄष्ठ प्रकाश योजना (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
रायगड जिल्हा प्राथमिक फेरीकरिता विशेष पारितोषिके
प्रथम क्रमांक १० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०६ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०४ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
अंतिम फेरीकरिता विशेष पारितोषिके
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका, महाराष्ट्रातील अस्सल मायबोली एकांकिका, लोककलेवर आधारित एकांकिका, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार व बाल कलाकार यांनाही विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
Be First to Comment