१० हजारांची लाच घेताना रोहा येथील सहाय्यक गटविकास अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •
रोहा येथे गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तसेच तळा पंचायत समितीचा अतिरिक्त गट विकास अधिकारी कार्यभार सांभाळत असणारे श्री. पंडित कौरु राठोड यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी कोकणभवन, नवी मुंबई येथे सुरू असून यातील आरोपी लोकसेवक (सहाय्यक गटविकास अधिकारी) यांना विभागीय चौकशीमधील सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमले आहे.
सदर विभागीय चौकशीमध्ये आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या बाजूने अहवाल पाठविण्याकरिता तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी पाच हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर उर्वरित 10 हजार रुपयांची मागणी केली म्हणून तक्रारदार यांनी आलोसे यांच्याविरुद्ध अँटी करप्शन ब्युरो येथे दिनांक 24 मार्च 2022 रोजी तक्रार दाखल केली होती त्यानुसार दिनांक 25 मार्च 2022 रोजी पंचसमक्ष पडताळणी केली असता 10 हजार लाचेची मागणी करून 10 हजार घेताना सहाय्यक गटविकास अधिकारी यांना रंगेहात पकडले आहे.
सदरची कारवाई ही रायगड अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने केली.
Be First to Comment