कागदपत्रे योग्य असतानाही मागीतली २०० रूपयांची लाच, बस चालकाने १०० दिले म्हणून पाठवले ५०० चे ई चलन : पोलिसांनी दिली चुकीची कबुली
पहा बस चालकांच्या रूद्र अवतारापुढे कशी झाली हफफ्तेखोर पोलीसांची बोलती बंद 👇
सिटी बेल | रायगड |
कागदपत्रे नाहीत,नियम मोडले तर पोलीस कारवाई करतात हे अगदी योग्यचं ते झालेचं पाहीजेत पण… एका खासगी बस चालकाची सर्व कागदपत्रे योग्य असताना देखील केवळ या रस्त्यावरून जाण्यासाठी इंट्री फी म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याकडून दोनशे रुपयांचा हफ्ता मागितला. मात्र त्या बसचालकाने या ट्रॅफिक पोलिसांना शंभर रुपये दिले याचाच राग धरून त्या ट्रॅफिक पोलिसाने बस चा मागुन फोटो काढला आणि बस चालकाला पाचशे रुपयाचे ई-चलन पाठवले. मग पुढे काय घडले वाचा ही संपूर्ण हकीकत….
रायगड बस मालक यूनियनचे मेंबर राजा अण्णा खारघर यांची टेम्पो ट्रॅव्हलर बस महाबळेश्वर येथून उरणकडे पॅसेंजर भरून येत असताना पेन रामवाडी ब्रिजवर असलेली पोलीस चौकी येथे ट्रॅफिक हवालदार यांनी रात्री 12.20 वाजता अडवली.ड्रायवरने गाडीचे पेपर दाखवले.पेपर ओके असताना देखील ड्रायवरला एन्ट्री मागितली असता त्याने 100/- रुपये एन्ट्री दिली आणि खारपाडा कडे रवाना झाला.
हवालदारला 100/- एन्ट्री कमी झाल्यामुळे त्याने रागाने बसच्या मागून फोटो काढून 500/- रुपये दंड असलेले सिग्नल वायोलेशन हे चलन ऑनलाईन टाकले. या चलनाबद्दल बस मालक यांना 12.20 ला म्हणजेच 5 मिनिटात त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला व त्यांनी ड्रायवरला बस पुन्हा त्या चौकीजवळ घेऊन जायला सांगितले,त्याप्रमाणे ड्रायवरने गाडी चौकीजवळ नेऊन हवालदार यांना विचारणा केली असता हवालदारने ड्रायवरला अपशब्द बोलून अरेरावी केली.
ही माहिती बस मालक राजा यांना मिळाल्यावर त्यांनी रायगड बस मालक यूनियनचे अध्यक्ष समीर माखिजा व इतर कमिटी मेंबर अमित गावंड व संदीप म्हसकर यांना सोबत घेऊन रात्री 12.45 वाजता पेण गाठून चौकीवर असलेल्या हवालदार यांची चुकी व वाईट उद्धट वर्तणूक,चुकीचे चलन ऑनलाईन मेमो याबद्दल कान उघाडणी केली. संबंधित हवालदार यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल बस मालक,बस ड्रायवर,पॅसेंजर व रायगड बस मालक कमिटी मेंबर यांची माफी मागितली.























Be First to Comment