Press "Enter" to skip to content

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उरणमधून धमकीचे पत्र

उरणमधील सायबर कॅफेची उरण व भायखला पोलीसांकडून तपासणी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र दिले गेले आहे. त्यामध्ये अश्लील भाषा वापरत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकी पत्रामध्ये उरणमधील सायबर कॅफेची तपासणी उरण व भायखला पोलिसांनी केली आहे. पोलीसपुढील तपास करीत आहेत. यामुळे उरणमध्ये खळबळ माजली आहे.

मुबंई महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी हे पत्र महापौर बंगल्यावर हे पत्र पोहचले होते. या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सायबर कॅफे ची तपासणी करतात पोलीस

माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे. पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्राच्यावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

धमकीच्या पत्रामध्ये मुद्दाम हीन दर्जाची भाषा वापरल्याचा दावा महापौरांनी यावेळी केला. “विजेंद्र म्हात्रे असं पत्र पाठवणाऱ्याचं नाव लिहिलं आहे. उरणचा पत्ता आहे. वकील खारच्या पत्त्यावर आहेत. पोस्टाचा शिक्का पनवेलचा आहे. पत्राचा पत्ता माझ्या जुन्या घराचा आहे. संभ्रम करणारं पत्र आहे, पण त्यातली भाषा संभ्रम करणारी नाही. हीन दर्जाची भाषा मुद्दाम वापरली आहे. शिवसेनेच्या महिला कशा आहेत, हे सगळ्या पक्षांना माहिती आहेत. अशी भाषा वापरून कटकारस्थान करण्याचा प्रयास केला जात असेल. माझं स्वत:चं काहीही झालं, तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाला कुणी धक्का लावण्याचा विचार केला, तर सहन करणार नाही”, असं महापौर यावेळी म्हणाल्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठविलेल्या धमकीच्या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या उरण येथील सायबर कॅफेचा शोध घेण्यासाठी मुंबई भायखला पोलीस ठाणे व उरण पोलीस ठाणे येथील पोलिस ठाणे येथील पथक दाखल झाले आहे. उरण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेट एक्स्प्रेस या सायबर कॅफेची चौकशी केली. यावेळी धमकी पत्रामधील नाव ऍड. विजेंद्र म्हात्रे असे नाव आहे तर सायबर कॅफे मालकाचे नाव विजेंद्र शिंदे असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. सदर घटनेची गंभीर दखल घेऊन पुढील तपास सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करू असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला.

उरण शिवसेनेतर्फे या संदर्भात उरण पोलीस स्टेशनला उद्या निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याची शिवसेनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.