Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची नियुक्ती

रायगड में होगा अब “महेंद्र बाहुबली” का राज

सिटी बेल | मुंबई |

एकीकडे केंद्रातील भाजप सरकार प्रत्येक पातळ्यांवर अपयशी ठरत असताना 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना धोबीपछाड देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. याच प्रयत्नांतअंतर्गत काँग्रेस पक्षातील सक्रिय,अनुभवी, क्रियाशील आणि प्रतिभाशाली नेतृत्व यांना पक्ष बांधणीत संधी देण्याचे काम आदरणीय सोनिया गांधी ,राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले करत आहेत. त्या प्रयत्नांतअर्गत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंटकचे राष्ट्रीय सचिव डॅशिंग अँड डायनामिक महेंद्र घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महेंद्र घरत यांचे कामगार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि पक्षबांधणी या चारही पातळ्यांवर नाव अग्रस्थानी घेतले जाते. विजिगीषू वृत्तीचे महेंद्र घरत यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत देखील काँग्रेस पक्षाचे तारू अत्यंत मेहनतीने पैलतिरी नेण्याचे काम चोखपणे बजावले आहे. न्यू मेरीटाइम जनरल कामगार संघटना या कामगारांच्या अत्यंत प्रामाणिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र असे काम करून दाखवले आहे.

पनवेल-उरण विभागातील बहुतांश आस्थापने या संघटनेच्या झेंड्याखाली येण्यासाठी आतुर झालेली आहेत. याचेच फलित म्हणून आजपर्यंत शेकडो कंपन्यांच्यात या संस्थेचा झेंडा फडकत आहे. योग्य व्यक्तीच्या हातामध्ये, योग्य पद दिल्याचे काँग्रेस कार्यकर्ते, कामगार प्रतिनिधी,कंपनी मालक आणि सामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत. महेंद्र घरत यांच्या सारख्या बेधडक आणि तितक्याच संयमी,सत्शील, विचारी नेतृत्वाकडे रायगड जिल्ह्याची धुरा आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येणार आहेत यात जराही दुमत नाही. महेंद्र घरत यांच्या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीकरीता सिटी बेल वृत्त समूहाकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.