सिटी बेल ∆ पनवेल ∆
वेगळ्या धाटणीच्या सिटीबेल वृत्तसमूहाच्या दिवाळी विशेषांकास मनःपूर्वक शुभेच्छा – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल परिसरातील अमराठी लोकांचा वाढता टक्का लक्षात घेता इंग्रजी मधून प्रसिद्ध होणाऱ्या सिटीबेल वृत्तसमूहाच्या दिवाळी विशेषांकास मनःपूर्वक शुभेच्छा देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी समूह संपादक विवेक मोरेश्वर पाटील आणि मंदार दोंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर इंग्रजी विशेषांकाचे प्रकाशन केल्यावर समूह संपादक विवेक मोरेश्वर पाटील आणि मंदार दोंदे यांनी मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिवाळी अंक भेट दिला.
यावेळी आपल्या भावना प्रकट करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सिटी बेल वृत्त समूहाचा हा तिसरा दिवाळी अंक एक अनोखी थीम घेऊन प्रसिद्ध करण्यात आला आहे.२०२० साली सिटी बेल समूहाच्या पहिल्या वहिल्या इंग्रजी दीपावली विशेषांकाचे प्रकाशन माझ्या शुभहस्ते झाले आहे याचे समाधान वाटते. कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या अप्रिय वातावरणात देखील पत्रकारिता करत मंदार दोंदे आणि विवेक पाटील यांनी एक अनामिक ऊर्जा प्राप्त करत समाज माध्यमांतील प्रश्न त्यांच्या प्रकाशनामध्ये मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.सिटी बेल वृत्त समूहाच्या पुढील वाटचालीस मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
यावेळी कोकण संध्या चे संपादक दीपक महाडिक, केवल महाडिक, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, रत्नागिरी टाइम्स चे ब्युरो ची किरण बाथम आदी मान्यवर उपस्थित होते.
सिटी बेल!!!
कडकडीत लॉक डाऊन मध्ये जन्माला घातलेले हे अपत्य…
सिटीबेल च्या पहिल्या वर्षीच्या दिवाळी अंकाची थीम होती दि शो मस्ट गो ऑन… आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या अंकाचे अनावरण केले होते..सिटीबेलच्या दुसऱ्या वर्षीच्या दिवाळी अंकावेळी लसीकरणाची प्रक्रिया जगभरात पूर्ण होऊन आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या झाल्या होत्या… त्यामुळे ट्रॅव्हल विशेषांक बनविताना एक्सप्लोर द वर्ल्ड!!! ही थीम केली होती…लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते त्या विशेषांकाचे प्रकाशन झाले होते.आणि यंदाच्या वर्षी पोस्ट पँडेमिक इन्व्हेस्टमेंट… या थीमवर तज्ञ लेखकांचे प्रत्येकाने संग्रही ठेवावेत या धाटणीचे लेख प्रसिद्ध केले आहेत.
Be First to Comment