Press "Enter" to skip to content

सोनेरी सुरांनी रंगली दिवाळी पहाट

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा काँग्रेस यांच्या सौजन्याने सुर नवा ध्यास नवा फेम विजेत्यांची सुरेल गाण्यांची मैफील

सिटी बेल ∆ शेलघर – उलवा नोड ∆

सर्व नागरीकांची दीपावली संगीतमय करण्यासाठी, यमुना सामाजिक संस्था व रायगड जिल्हा काँग्रेस यांच्या सौजन्याने आज सकाळी ०७.०० वाजता कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा फेम विजेत्यांच्या सुरेल गाण्यांच्या मैफीलीचे आयोजन स्व.जोमा नारायण घरत समाजमंदीर, शेलघर, उलवे नोड येथे करण्यात आले होते.

यावेळी मंदार पिळवळकर, उत्कर्ष वानखेडे, श्वेता ठाकूर, आरोही प्रभुदेसाई यांनी आपल्या गाण्याने रसीकांना मंत्रमुग्ध केले. तर महेश गाडगीळ यांनी आपल्या बहारदार आवाजात सुत्रसंचलन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या सुरेल संगीत मैफीलीचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक महेंद्रशेठ घरत ( अध्यक्ष : यमुना सामाजिक- शैक्षणिक संस्था, शेलघर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी ), ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ भक्तीकुमार दवे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, प्रताप गावंड, एम के जी एस कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, मोहन गायकवाड, मिलिंद पाडगावकर, सिटी बेल वृत्त समुहाचे समुह संपादक विवेक पाटील, रायगड जिल्हा महीला काॅंग्रेस अध्यक्षा श्रध्दा ठाकूर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात येथील रसीक प्रेशकांनी सुमारे दीड लाखांची रोख बक्षिसे देऊन कलाकारांचा उत्साह वाढवीला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.