यामाहा मोटारसायकलचे इंजिन वापरून तयार केली एटीव्ही – बाईक
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रसायनी येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पिल्लई एचओसी मधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्टारकर्स मोटारस्पोर्ट्स या विद्यार्थी गटाने एटीव्ही बाईकची निर्मिती केली असून कॉलेजच्या प्रांगणात एटीव्ही – बाईकचा अनावरण सोहळा मोठया जल्लोषात पार पाडला.
यावेळी कॉलेजच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, आर्थिक मदत देणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी, स्टारकर्स मोटारस्पोर्ट्स चे विद्यार्थी, विभागीय मार्गदर्शक, पालक आदी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
रसायनी येथील पिल्लई एचओसी महाविद्यालयाच्या पंचविस विद्यार्थ्यांनी यामाहा एफझेड २५ या दुचाकिचे इंजिन वापरून एटीव्ही बाईकची निर्मिती केली असून ही बाईक राष्ट्रीय पातळीवरती होणारी क्वाडटॉर्क 2022 स्पर्धेसाठी बनविली गेली आहे. या स्पर्धेमध्ये भारतामधून वेगवेगळ्या राज्यामधून १५० पेक्षा जास्त अभियांत्रिकी शाखेतील टीम्स सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा इंजिनिअरींग शाखेसाठी मुलांना अभियांत्रिकीचे शिक्षण प्रत्यक्षरित्या अवलंबण्यासाठी महत्वाची मानली जाते. म्हणून सर्व अभियांत्रिकी कॉलेजेस व II.T. चे विद्यार्थि सहभागी होतात. ही स्पर्धा मदुराई (तामिळनाडू) येथे २७ जुलै २०२२ तारखेला क्वाडटॉर्क 2022 नावाने खेळली जाणार आहे.
यापुर्वी पिल्लई एचओसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील स्पर्धेत अव्वल दर्जाचे क्रमांक पटकावून पिल्लई एचओसी महाविद्यालयाच्या कॉलेजला मानाचा पुरस्कार मिळवून दिला आहे.
त्याचबरोबर मागील २०२१ वर्षी देखील आयआयटी बॉम्बे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत पिल्लई एचओसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक बाईक बनवून पहिला क्रमांक पटकाविला.
एटीव्ही क्वाड बाईक च्या अनावरण सोहळ्यासाठी वार्षिक मदत पिल्लई एचओसी महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थेकडून मिळाली. सदरदिवशी आर्थिक मदत दिलेल्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बाईक बनविण्यासाठी पिल्लई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई तसेच सचिव डॉ. डेफनी पिल्लई यांनी प्रोत्साहन देवून सहकार्य केले. यावेळी संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. निवेदिता श्रेयांश, Dy.CEO डॉ. लता मेनन आदी उपस्थित होते व COO डॉ. प्रियम पिल्लई, श्री प्रणव पिल्लई आणि श्रीमती मुनाविरा कोटयाड यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली.
ही बाईक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. जगदीश बाकल, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. पाटील, प्राध्यापक के. एस. अनिश आणि प्राध्यापक आदित्य शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.सर्वात शेवटी पिल्लई एचओसी महाविद्यालयाच्या Dy. CEO डॉ. लता मेनन, प्राध्यापक डॉ. जगदीश बाकळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Be First to Comment