Press "Enter" to skip to content

“राऊंड द क्लॉक” काम करणारे आमदार

आमदार बाळाराम पाटील यांनी
औरंगाबाद येथे जाऊन मध्यरात्री घेतली उपोषणकर्त्यांची भेट

सिटी बेल • प्रतिनिधी • औरंगाबाद •

माजी आमदार स्व. दत्तु शेठ पाटील यांच्या संस्कारात तयार झालेले आणि त्यांचा राजकीय वारसा चालविणारे आमदार बाळाराम पाटील हे एक अजब रसायन आहे.हाती घेतलेली कामे पूर्ण करताना “राऊंड द क्लॉक” काम करणारे आमदार बाळाराम पाटील यांच्या सारखे महाराष्ट्रात अत्यंत कमी राजकीय नेते असतील.

सोमवारी मध्यरात्री दमदार आमदार बाळाराम पाटील यांनी नवयुग क्रांती शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री.गजानन लक्ष्मण खैरे यांनी औरंगाबाद स्मशानभूमी येथे २ एप्रिल २०२२ पासून शिक्षकांच्या विविध प्रलंबित विषयासंदर्भात बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्यांची भेट घेतली.

यावेळी आमदार श्रीकांत देशपांडे सर, आमदार दत्तात्रय सावंत सर उपस्थित होते. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर शासन दरबारी त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्‍वासन या तिन्ही आमदारांनी त्यांना दिले.

आमदार बाळाराम पाटील यांनी सोमवारी सकाळी पनवेल उरण महा विकास आघाडीच्या वतीने आयोजित महामोर्चाचा आढावा घेतला, त्यानंतर पनवेल च्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला, महा मोर्चाच्या नियोजन समन्वयसंबंधी विविध पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधून, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महामोर्चाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री थेट औरंगाबाद गाठले.

आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्यकुशलतेचा धडाका एव्हाना पाच जिल्ह्यातील जनतेला ठाऊक झाला आहे. काळवेळ,भान हरपून जनतेच्या समस्या निवारण करता कार्यरत असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे रसायन खरोखर अजब आहे…

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.