Press "Enter" to skip to content

मोठी बातमी ! एसटी संपाचा तिढा अखेर सुटल्यात जमा ?

22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू होण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश : तोपर्यंत सरकारने कारवाई करू नये पण नंतर मात्र सरकारला कारवाईचा मार्ग मोकळा

सिटी बेल • मुंबई •

22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत सरकारने कारवाई करू नये पण नंतर मात्र सरकारला कारवाईचा मार्ग मोकळा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संपकरी यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाची दिशाभूल करु नये, असे सांगत न्यायालयाने त्यांनाही चांगलेच फटकारले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात काय घडले ?

● ’22एप्रिलपर्यंत ST कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे’
● कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार, राज्य सरकारची कोर्टात माहिती
● FIR मागे घेऊ शकत नाही, राज्य सरकारची कोर्टात माहिती
● याबाबत हायकोर्ट आज संध्याकाळी आदेश देणार
● तसेच वकील सदावर्तेंनी न्यायालयाची दिशाभूल करू नये, असं हायकोर्ट सुनावलं

राज्य सरकारने कोर्टात काय सांगितले ?

● FIR मागे घेऊ शकत नाही, राज्य सरकारची कोर्टात माहिती
● कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल मात्र प्रक्रियेद्वारे, म्हणजे कर्मचाऱ्यांनी अपील करून…
● पुन्हा असे वर्तवणूक करू नये अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्या – हायकोर्ट
● 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – हायकोर्ट
● सदावर्ते न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका – हायकोर्ट
● आम्ही आदेश देणार, आम्ही कोणाशी सहमती घेणार नाही
● सदावर्ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, आक्रमक होऊन प्रश्नसुटत नाहीत

सदावर्ते काय म्हणाले ?

● कर्मचारी दुखवट्यात आहेत, ही युनियन नाही, कर्मचारी वैयक्तिकरित्या लढत आहेत
● कर्मचारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत,
● न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. संध्याकाळी याबाबत निर्णय होणार आहे.

मोठी बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.