Press "Enter" to skip to content

बालाजी सिंम्पोेनी जळीत महिला मृत प्रकरणाचा उलगडा

पैशाच्या मामल्यातून घडले जळीतकांड : पळून गेलेल्या तरुण-तरुणीला घातल्या बेड्या

सिटी बेल • पनवेल •

पनवेलपासून जवळच असलेल्या सुुकापूरमधील बालाजी सिंम्पोेनी या रहिवाशी संकुलातील महिला जळीत प्रकरणाचा उलगडा झालाय…खांदेश्‍वर पोलीसांनी एक-एक कडी जोडत प्रकरण उघड केले…हा सर्व प्रकार पैशाच्या मामल्यातून झालाय…पळून जाणार्‍या तरुण-तरुणीने पैशावरुन हे कृत्य केल्याचे उघड झालंय…

बालाजी सिंम्पोेनी या रहिवाशी संकुलात रुम नं.2805 मध्ये सरिता महेश पताडे (वय 44) व यांच्यासोबत गौरी शंकर केदारी राहतात….गौरी केदारी यांनी मोहिनी धनंजय ढमढेरे यांच्याकडून सरकारी नोकरीला लावते म्हणून पैसे घेतले होते…हे पैसे वसुुल करण्यासाठी मोहिनी ढमढेरे व धनंजय आंद्रे रा.उत्तमनगर पुणे, हे बालाजी सिंम्पोेनीत गेले होते…

गौरी हिला घाबरविण्यासाठी मोहिने हिने बाटलीत पेट्रोल व मेणबत्ती सोबत घेतली होती…रुममध्ये जाऊन गौरीकडून पैशाची मागणी करुन तिला पेट्रोल आणि मेणबत्तीची भीती दाखविण्यात आली…यावेळी सरिता पताडे या मध्ये पडल्या…त्या गौरीला वाचविण्याचा प्रयत्न करु लागल्या….

झालेल्या झटापटीत बाटलीतील पेट्रोल सरिता पताडे यांच्या अंगावर उडाले….त्यानंतर आगीचा भडका उडाला….त्यात सरिता पताडे पूर्णपणे भाजल्या गेल्या….त्यांचा जागीच मृत्यू झाला….या कृत्यानंतर मोहिनी ढमढेरे व धनंजय आंद्रे तेथून लागलीच पळून गेले….

एकंदर गुंतागुतीच्या या प्रकरणाचा खांदेश्‍वर पोलीसांनी तपास करुन मोहिनी ढमढेरे व धनंजय आंद्रे यांचा शोध घेतला…आग प्रकरणाला ते दोघे दोषी असल्याचे सिद्ध करुन त्या दोघांविरोधात भादंविक 304 अन्वये गुुन्हा दाखल केला….अधिक तपास खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.