राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होणार ?
सिटी बेल • मुंबई •
राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला.यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली.
नैसर्गिक वायूचा कर १३.५ टक्क्यांवरून ३.५ टक्के इतका केला आहे.यामुळे राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान,नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने नैसर्गिक वायूवरील करामध्ये १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला. तर यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे ८०० कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे.
Be First to Comment