संयम राखून सहकार्य करणाऱ्या ठेवीदारांचे मनःपूर्वक आभार – आमदार बाळाराम पाटील
पहा काय म्हणतात आमदार बाळाराम पाटील 👇👇
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ३८,६०० ठेवीदारांचे पैसे मिळणार
ठेवीदार विमा संरक्षणाचे ३७४ कोटी रुपये बँकेत झाले जमा
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आमदार बाळाराम पाटील यांनी मानले आभार
सिटी बेल | पनवेल |
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेवीदार विमा संरक्षण मंडळाने कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या बँक ऑफ बडोदा या खात्यामध्ये तब्बल ३७४ कोटी रुपये जमा केल्याची बातमी खात्रीलायक सूत्रांकडून समजते. ठेवीदारांना दिलासा देणाऱ्या या बातमीमुळे पनवेल उरण परिसरात असणाऱ्या ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
याबाबत माहिती देताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, मी सर्व ठेविदारांचे अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असतानाच त्यांचे मनापासून आभार मानतो. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे प्रकरण राजकीय आयुध म्हणून वापरण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. ठेवीदारांना चिथवण्यात आले,मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला परंतु या सगळ्या मंडळींना माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यामध्ये रस होता. ठेवीदारांच्या पैशाशी त्यांना काहीही देणेघेणे नव्हते. आम्ही मात्र ठेवीदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो व ठेवीदार विमा संरक्षणाचे पैसे त्यांना मिळावे यासाठी कायम प्रयत्नशील राहिलो. त्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे पाहून समाधान लाभते.

१३ ऑगस्ट रोजी बँक अवसायानात जाहीर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ठेवीदार विमा संरक्षण अंतर्गत बँकेतील ३८,६०० ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.वास्तविक या ठेवीदारांपैकी जवळपास 90 टक्के ठेवीदार हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे चिथावणीखोर राजकारण करून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पक्षापासून दूर नेण्याचे प्रयत्न अनेक मंडळींनी केले. परंतु त्यांचे मनसुबे पूर्ण करण्यात त्यांना यश आले नाही, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास ठेऊन संयम दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पुढच्या आठ दिवसात वाटपाला सुरुवात होणार असून दीड महिन्याच्या कालावधीत सर्व ठेवीदारांचे पैसे मिळणार आहेत.
या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रचंड सहकार्य केले त्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे विमा संरक्षणाचे पैसे बँकेत जमा झाल्याचे समजताच आमदार बाळाराम पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांना दूरध्वनी करून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.





















Be First to Comment