प्रामाणिक रिक्षा चालकप्रदीप चिंचकर यांचे होत आहे कौतुक
सिटी बेल | पनवेल |
आज रिक्षा चालक प्रदिप चिंचकर हे खांदा कॉलनी येथील शिवाजी चौक सेक्टर 10 येथे खानदेश हॉटेल समोरून जात असताना त्यांना एक अनोळखी पर्स सापडली. त्या पर्समध्ये रोख रक्कम 60000 तीन ग्रॅम सोन्याची वस्तू व एक मोबाईल असा ऐवज होता.
परंतु हजारों रूपयांचा तो ऐवज पाहुनही त्यांना कुठलाही मोह झाला नाही. त्यांनी आपली नितीमत्ता आणि प्रामाणीकपणा सोडला नाही. ती पर्स घेऊन प्रदीप चिंचकर ताबडतोब खांदेश्वर पोलीस स्टेशनला गेले.
पर्समध्ये मोबाईल वाजत असताना पोलिसांनी फोन उचलला, तो फोन श्रीमती सुमन गुरव सेक्टर 11 मंगलमूर्ती येथील रहिवासी यांचा होता. त्या बोलल्या की, माझी पर्स हरवली आहे. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्यांना पोलिस स्टेशनला बोलवून सदरच्या पर्स ची ओळख पटवून आणि रोख रक्कम त्यांना परत केली.
खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी प्रदीप चिंचकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी सर्व रिक्षावाल्यांतर्फे व खांदा कॉलनी येथील सर्व रहिवाशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Be First to Comment