Press "Enter" to skip to content

आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा

खोपोली : प्रतिनिधी

आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने २१ जून जागतिक योग दिनानिमित्त आयोजित विशेष योग शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत योगाचे महत्त्व अनुभवले.

या कार्यक्रमाला खालापूर पंचायत समितीच्या सदस्या प्रमिलाताई महेश पाटील, कोयना मराठा समाजाचे माजी अध्यक्ष विठ्ठलजी मोरे, जेष्ठ मार्गदर्शक एमडी चाळके, वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील, अखिल सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अशोक मरागजे, शामकांत सावंत, विलास सावंत, वडवळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा परिषद शाळा वडवळचे मुख्याध्यापक सुधाकर थळे तसेच हेल्प फाउंडेशन, उत्तम फुड्स, गोदरेज अँड बॉईज, टाटा स्टील, एपीएल गॅस आणि बॅकबेस्ट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, तसेच तणावमुक्त जीवनासाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष जगदीश मरागजे आणि योग शिक्षक सुधाकर थळे यांनी केले. उपस्थितांनी विविध योगासनांचा सराव करत निरोगी जीवनाचा संकल्प केला.

उत्कृष्ट आयोजन आणि ओघवत्या समालोचनामुळे शिबिरात विशेष रंगत आली. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सुधीर मुसळे, प्रमोद सावंत, सचिव प्रवीण सावंत, सहसचिव मंगेश सावंत, खजिनदार सागर मोरे, उपक्रम प्रमुख सचिन जाधव, ज्येष्ठ सल्लागार अनिल सावंत, गणेश सावंत, सचिन मरागजे, आशिष चाळके, रवींद्र मरागजे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.