
अवैध खैराने भरलेला पिकअप टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडीसह ४ आरोपी पकडून दिले
रोहा : समीर बामुगडे
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर, नाडसूर विभागात अवैध खैराची तस्करी सराईत टोळी करत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच सिद्धेश्वर येथील शेकडो तरुणांनी रात्री आणि दिवसा पहारा ठेवून मेहनत घेऊन या विभागात खैर चोरटोळीला पकडण्यासाठी फिल्डिंग लावली होती.
दिनांक 21/6/2026 रोजी रात्री या विभागात ग्रामस्थांना माहिती मिळाल्या प्रमाणे काही वाहने रात्री घीरट्या घालत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असता खैर भरलेल्या गाड्या अडवण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावले होते. ग्रामस्थ आलेल्या गाडीला आडविण्यासाठी गेले असता भरलेली स्कार्पिओ गाडी ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न या टोळीने केला परंतु ग्रामस्थांनी न डगमगता धाडस दाखवून स्कॉर्पिओ गाडी सिद्धेश्वर येथे पकडली ड्रायव्हर मात्र फरार झाला. तसेच खांडसई – नाडसुर रस्त्याला दबा धरून बसलेल्या ग्रामस्थांनी धाडस दाखवून, जीवावर उदार होऊन रात्री 2:30 च्या दरम्यान अवैध खैराने भरलेला पिकअप टेम्पो, तसेच 4 आरोपी- राजू अरुण हिलम -रा. नाडसुर, प्रशांत नंदकुमार जाधव-रा. माप्रल – मंडणगड, रोहित पांडुरंग चोरगे -रा. माप्रल, कतिश उमेश राठोड -रा. 21 गणपती सिद्धेश्वर यांना पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले .
यावेळी रात्री सिद्धेश्वर येथे घटनास्थळी उपस्थित सुधागड वनपरिशेत्र अधिकारी विशाल सोनवले, मेजर साळुंखे, कणसे वनपाल – उत्तम शिंदे, आनंदराव कराडे. वनरक्षक- सुनील जाधव, रुपेश इंगोले, व्यंकट पवार, गुलचन काकडे, संदीप ठाकरे, अविनाश पाटील उपस्थित होते. वनविभागाने भरलेला पिकप टेम्पो नं -MH-06cp-2260, स्कॉर्पिओ MH06An1276 आणि 4 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या चार आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41(2)ब (2) महाराष्ट्र वन नियमावली 2014 कलम31(1) 3) भारतीय न्याय सहिता 2023कलम 303(2) गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मुद्देमाल सह दोन्ही वाहने वनविभागाच्या ताब्यात आहेत.
चारही आरोपी वनविभाग कस्टडी मध्ये असून अधिक माहितीसाठी लॉकअप मध्ये कसून चौकशी चालू आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी ता.सुधागड विशाल सोनवले यांच्या अधिपत्याखाली वनपाल वनरक्षक करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीं ना अधिक तपासासाठी चार दिवस वनविभाग लॉकअप ( क स्टडी ) मध्ये ठेवण्यात येणार आहेत.


Be First to Comment