Press "Enter" to skip to content

कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार


पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज विशेष सत्कार करण्यात आला.

शिवसेनेचे खांदा वसाहत विभागाचे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांची कन्या कु. सायली सदानंद शिर्के हिने वकिलीचे शिक्षण पूर्ण करून ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल आज खांदा-पनवेल शाखेत तिचा सत्कार करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. यावेळी पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल समन्वयक शिवाजी पालांडे तसेच शाखेतील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. ॲडव्होकेट सायली शिर्के हिचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशिर्वाद देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.