Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा कॉंग्रेसचे काम कौतुकास्पद

अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव बि.एम. संदीप यांच्याकडून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यावर स्तुतीसुमने

सिटी बेल | शेलघर |

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुख्य नोंदणीकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर समाज मंदिर हॉल शेलघर,येथे आयोजित करण्यात आले होते. आत्ताच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने २२ उमेदवार उभे केले होते त्यापैकी ९ उमेदवार निवडून आले आहेत. मागच्या निवडणुकीच्या निकालापेक्षा ४ उमेदवार जास्त निवडून आले आहेत. तर ३ उमेदवार फक्त १ ते २ मतांनी पराजित झाले आहेत. एकूणच रायगड जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळाली आहे. तसेच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाचे काम जोमात सुरु आहे असे गौरवोद्गार प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव बि. एम. संदीप यांनी काढले. यावेळी जासई येथील श्री. यशवंत बाळाराम घरत व सुभाष अनंत घरत यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्षा सौ. चारुलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश सहकार सेलच्या अध्यक्षा सौ. शुभांगी शेरेकर,महाराष्ट्र प्रदेश सचिव नाना जगताप, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, सौ. नंदा म्हात्रे,रायगड जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ. श्रद्धा ठाकूर, तसेच सर्व तालुका/ शहर अध्यक्ष व जिल्ह्यातून ७४ मुख्य नोंदणीकर्ते उपस्थित होते. या नोंदणीकर्त्यांना डिस्ट्रीक्ट ट्रेनर मिलिंद पाडगांवकर यांनी प्रशिक्षण दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.