Press "Enter" to skip to content

सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अँबेसिडर

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी पर्यंत पनवेलमध्ये

सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची लाभणार उपस्थिती ; ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान

सिटी बेल | पनवेल |

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी पर्यंत पनवेलमध्ये होणार असून या स्पर्धेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची उपस्थिती लाभणार असून या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने आहेत, अशी माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज (दि. १९) खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन गौरव करण्यात येणार आहे.तसेच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे मान्यवर व्यक्तींचा या वर्षीपासून जीवन गौरव स्वरूपात ‘गौरव रंगभूमीचा’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून यंदा या पुरस्काराने ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप पुरस्काराचे असणार आहे, अशीही माहिती परेश ठाकूर यांनी यावेळी दिली.

सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस अभिनेते ओमकार भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर सीता पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, अभिनेते भरत सावले, सीकेटी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. के. पाटील, अभिषेक पटवर्धन, श्याम पुंडे, स्मिता गांधी, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पुढे सांगितले कि, नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. जळगाव, नागपूर, पुणे, पनवेल, रायगड या राज्यातील सर्व केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडल्या असून अंतिम फेरीसाठी २५ एकांकिकांची निवड झाली आहे.

कोरोना संदर्भात नियमांचे पालन करून अंतिम फेरी २८, २९ आणि ३० जानेवारी २०२२ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, २००७ साली मल्हार करंडक म्हणून हि राज्यस्तरीय स्पर्धा होती. कलाकार व प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता २०१४ पासून स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने हि राज्यस्तरीय स्पर्धा करण्यात आली. रमेश सिप्पी, प्रेमानंद गज्वी, गंगाराम गव्हाणकर, जयंत सावरकर, जयवंत वाडकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, जयवंत वाडकर, आदिती सारंगधर, किरण जुनेजा, प्रदीप मुळे, राजन ताम्हणे, समीर खांडेकर, राजन भिसे, शर्वाणी पिल्ले, क्रांती रेडकर, विजय चव्हाण, विजय कदम, विजू खोटे, अविनाश खर्शीकर, संजय नार्वेकर, ऋतुजा देशमुख, मनोज जोशी अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या स्पर्धेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. असे सांगतानाच २०१६ साली झालेल्या स्पर्धेत ओमकार भोजने यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार पटकाविला होता आणि ते आज आपल्या या स्पर्धेचे ब्रॅण्ड अँबेसिडर आहेत, याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद करत हि स्पर्धा उत्तरोत्तर समृद्ध होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावर्षी एकांकिका स्पर्धेचे थीम सॉंग तयार करण्यात आल्याचेही सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी ओमकार भोजने यांनी बोलताना सांगितले कि, मी अशा स्पर्धांमुळे पुढे आलो आहे. एकांकिका स्पर्धा आमच्या सारख्या कलाकारांना मोठी पर्वणी ठरली आहे. बक्षिसांपेक्षा संधी महत्वाची असते, मात्र या स्पर्धेत बक्षिस आणि संधी दोन्हीही मोठी आहे. युवा पिढीला असा व्यासपीठ मिळाला तर तो थांबत नाही. त्यामुळे हे व्यासपीठ नवोदित होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ असून एकांकिका स्पर्धा नसती तर मी पुढे आलो नसतो, याच स्पर्धेतील मी उत्कृष्ट अभिनेता म्हणून मान मिळविला आणि त्याच स्पर्धेचा ब्रॅण्ड अँबेसिडर झालो, याचा मला अभिमान व अत्यानंद आहे. असेही भोजने यांनी आवर्जून नमूद केले.

——– अशी आहेत पारितोषिके :——–

प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, आणि मानाचा अटल करंडक,
द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,
तॄतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,
चतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ एकूण दोन बक्षिसे प्रत्येकी ०५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.

सर्वोत्कॄष्ठ अभिनेता(वैयक्तीक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

सर्वोत्कॄष्ठ अभिनेत्री (वैयक्तीक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

सर्वोत्कॄष्ठ दिग्दर्शक (वैयक्तीक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

सर्वोत्कॄष्ठ लेखक (वैयक्तीक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

सर्वोत्कॄष्ठ संगीत (वैयक्तीक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

सर्वोत्कॄष्ठ नेपथ्य (वैयक्तीक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

सर्वोत्कॄष्ठ प्रकाश योजना (वैयक्तीक)
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ – प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

रायगड जिल्हा प्राथमिक फेरीकरिता विशेष पारितोषिके
प्रथम क्रमांक १० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०७ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०५ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

अंतिम फेरीकरिता विशेष पारितोषिके
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका, महाराष्ट्रातील अस्सल मायबोली एकांकिका, लोककलेवर आधारित एकांकिका, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार व बाल कलाकार यांनाही विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

– अंतिम फेरीसाठी निवड झालेले संघ –

सेल नसलेला रेडिओ (नूतन मराठा कॉलेज, जळगाव), पहाटेचा मृत्यू (अंभृणी सेवा संस्था, नागपूर), सूर्याची सलामी (व्हीएमव्ही कॉलेज, नागपूर), माझी बाजू माझा पक्ष (डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे शिक्षण संस्था, नागपूर), स. न. वि. वि. (देवल क्लब, कोल्हापूर ), विषाद (रंगपंढरी, पुणे), आय ऍग्री टू (आमचे आम्ही पुणे, पुणे), चिऊताई चिऊताई दार उघड (स्पॉट लाईट पनवेल, पुणे), त्रिशंकू (कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण, रायगड), गुज (फ्रायडे, अलिबाग, रायगड), पार्वती सदन- १०५ अ, ब, क (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, रायगड) हायब्रीड (ऍबस्ट्रॅक्ट थिएटर, मुंबई), मानलेली गर्लफ्रेंड (इंद्रधनू, मुंबई), साबण (मृदा, कल्याण), राकस (कलासक्त, मुंबई), प्रसाद (रुईया कॉलेज, मुंबई), बेकलाइटी बेकलाइटी (मिथक, मुंबई), जनावर (प्राण, मुंबई), ए वन (माध्यम कलामंच, मुंबई), मौनांतर (नागाबादेवी कलामंच, वसई), व्हेन सुमेध मिट्स राधिका (फोर्थ वॉल, ठाणे) बिलिमारो(ढ मंडळी, कुडाळ), मनस्वीनी (निर्माती, वसई), तिडीक (प्रमुख थिएटर्स, मुंबई), लेखक (कल्लाकार्स थिएटर, ठाणे).

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.