Press "Enter" to skip to content

चिर्ले गावावर शोककळा

प्राणीमित्र आनंद मढवी यांचे अपघाती निधन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण तालुक्यातील चिर्ले गावचे प्राणीमित्र आनंद मढवी (४५) यांचे आज सकाळी गव्हाण फाटा परिसरात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह उरण परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

आनंद मढवी हे चिर्ले येथील घरातून पनवेलकडे कामानिमित्त जात असताना गव्हाणफाटाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आनंद मढवी हे वन्यजीव निसर्ग संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

प्राणीमित्र आनंद मढवी यांनी आजपर्यंत हजारोंच्या संख्येने सापांना व वन्यजीवांना जीवदान देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे ते फक्त उरण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्राणीमित्र म्हणून ओळखले जात होते. आज मात्र त्यांच्यावर काळाने झडप घालत त्यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यासह उरण परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

आनंद मढवी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलं व भाऊ असा मोठा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.