Press "Enter" to skip to content

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा ५० हजारांची रोकड असलेली पर्स केली पोलिसांच्या स्वाधीन : रिक्षा चालक नरेंद्र ठाकूर यांचे सर्वत्र होतय कौतुक

पेण, ता. १४ (वार्ताहर) : पेण शहरातील गुरव आळी येथून रिक्षा चालक नरेंद्र ठाकूर यांनी प्रवाशी घेऊन तो रेल्वे स्थानक येथे सोडल्यानंतर आपल्या रिक्षा मध्ये प्रवाशाची पर्स राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यामध्ये तब्बल ५० हजार रुपये रोख रक्कम असल्याने ती पर्स त्यांनी तात्काळ पेण पोलिसांच्या स्वाधीन केल्याने त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त मंगेश मुरलीधर शिवापुरकर, रा. डोंबिवली, जि. ठाणे हे आपल्या कुटुंबीयांसह पेण येथे आले होते.ते गुरव आळी येथून रिक्षाने रेल्वे स्थानकाकडे जात असताना त्यांच्याकडील पर्स रिक्षातच विसरली यावेळी रिक्षा चालक नरेंद्र ठाकूर यांनी सदर पर्स मध्ये असलेल्या ५० हजारांच्या रोकडचा मोह न ठेवता प्रामाणिकपणाचा दाखवत पैशाने भरलेली पर्स पेण पोलिसांच्या स्वाधीन केली.

दरम्यान पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर ते चिंतेत असतानाच शिवापुरकर कुटुंब यांनी पोलीस ठाण्याची संपर्क साधला असता पोलिसांनी खात्री करून ती पर्स मालकाला सुरक्षितपणे परत केली.त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या सणात आपली एवढी मोठी रोख रक्कम रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाने परत मिळाल्यामुळे नरेंद्र ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.