

कोपर, पनवेल : रायगडमधील भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या कोपर येथील ‘रंजना’ निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मंगलमय आगमन झाले. गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण म्हात्रे कुटुंबीयांमध्ये आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते मा. नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली म्हात्रे कुटुंबात अनेक वर्षांपासून गणेशोत्सव श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा जपली जात आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बाप्पाचे स्वागत करणे, विधिवत पूजा-अर्चना व आरती करणे आणि श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणे, हा या उत्सवाचा अविभाज्य भाग राहिला आहे. यंदाही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपण्यात आली.

श्री गणरायाच्या आगमनानंतर मा. नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे साहेब, श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्यासह म्हात्रे कुटुंबातील सर्व सदस्यांनी भक्तिभावाने बाप्पाची विधिवत पूजा-अर्चना व आरती करून मनोभावे स्वागत केले. कुटुंबातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी गणरायाच्या स्वागतामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. गणपती बाप्पाच्या जयघोषाने ‘रंजना’ निवासस्थान आणि परिसर भक्तिमय झाला होता.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘रंजना’ निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेत बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यानिमित्ताने स्नेह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले.
यावेळी श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.
“गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव असून कुटुंबासह समाजाला एकत्र आणणारा आनंदाचा सोहळा आहे. आमच्या कुटुंबाने अनेक वर्षांपासून जपलेली गणेशोत्सवाची परंपरा आम्ही त्याच श्रद्धेने पुढे नेत आहोत. श्री गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आणि परिसराच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे बळ आम्हाला मिळो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे,” अशी भावना श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त केली.
गणरायाच्या आगमनाने ‘रंजना’ निवासस्थानी प्रसन्न आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून, मा. नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे साहेब, श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे आणि संपूर्ण म्हात्रे कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


Be First to Comment