Press "Enter" to skip to content

शहाबाज गावाचे सुपुत्र प्रतिक जुईकर देशातील महत्वाची यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण

आगरी समाजाचा प्रतिक जुईकर रायगड जिल्ह्यातील पहिला युपीएससी अधिकारी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचा सुपुत्र प्रतिक जुईकर यांनी देशातील महत्वाची परीक्षा समजली जाणारी यूपीएससीची परीक्षेत घवघवीत यश मिळवीत रायगड जिल्ह्यातील पहिला यूपीएससी फ़ायनालिस्ट ठरला आहे. प्रतिक जुईकर हे आगरी समाजाचे असून ते जिल्ह्यातील शहाबाज येथील आहेत. त्यामुळे आगरी समाजाची मान अभिमानाने उंचावली आहे. या यशाबद्दल प्रतिकवर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोल्हारे शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर जुईकर यांचे सुपुत्र प्रतिक जुईकर यांनी देशातील महत्वाची यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचा अडथळा पार करीत देशात 177 वा क्रमांक मिळविला आहे. प्रतीक जुईकर यांच्या या यशाबद्दल आगरी समाजाबरोबर कर्जत तालुक्याची तसेच रायगड जिल्ह्याची मान उंचावली आहे.

प्रतिक जुईकर रायगड जिल्ह्यातील पहिला यूपीएससी फ़ायनालिस्ट ठरला आहे. थेट आयएएस झालेला जिल्ह्यातील पहिला म्हणून प्रतिक जुईकर यांची नोंद झाली आहे. प्रतिक जुईकर हा कर्जतच्या अभिनव प्राथमिक शाळेत दहावीच्या परीक्षेत कर्जत तालुक्यात पहिला आला होता. सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट असून रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.