Press "Enter" to skip to content

अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात नारायण राणेंनी लावली हजेरी

न्यायालयाचा आदर ठेवत चौकशीला हजर : नारायण राणे

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चौकशीसाठी अलिबाग येथे हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या न्यायालयाच्या आदेशाचा आदर करीत चौकशी साठी अलिबाग येथे हजर राहिलो आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलिबाग येथे केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड कोर्टाकडून राणेंना जामीन मंजूर झाला होता. तसेच, राणेंना अलिबाग पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रकृती अस्वस्थामुळे 30 ऑगस्ट रोजी अनुपस्थित राहिल्यानंतर आज सोमवारी नारायण राणेंनी अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहून हजेरी लावली.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेच्यावेळी महाड येथे २३ ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्याविरोधात महाडसह नाशिक, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. महाड शहर पोलीस ठाण्यात राणे यांच्यावर भा.दं.वि. क. १५३/२०२१ अ (१) (ब), (क), १८९, ५०४, ५०५ (२), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांना महाड येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र राणे यांना जामीन मंजूर करताना पुराव्यांमध्ये छेडछाड करण्यात येणार नाही, या प्रकरणातील संबंधितांना, साक्षीदारांना धमकावू नये, ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी अलिबाग येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत हजेरी लावावी, तपास यंत्रणेला सहकार्य करावे, आदी अटी न्यायालयाने घातल्या होत्या.

माध्यमांशी बोलताना राणेंचे वकील

त्यानंतर आज 13 सप्टेंबर रोजी राणे हजर राहीले आहेत. दरम्यान, नारायण राणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजेरी लावण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दहा अधिकाऱ्यांसह सुमारे १०० पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुंबई येथून बोटींने येणार होते.मात्र त्यांनी ऐनवेळी दौरा बदलत बारा वाजता मुंबई येथून पनवेल पेण करीत आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.