Press "Enter" to skip to content

प्रज्ञा शोध परीक्षेत केळकर विद्यालयाचा आयुष शिंदे राज्यात प्रथम

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत अलिबागच्या चिंतामणवराव केळकर विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी आयुष दत्तात्रय शिंदे याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ जानेवारी २०२३ रोजी इयत्ता चौथीची प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत आयुष शिंदे यांने ३००

पैकी २६४ गुण मिळवले. चिंतामणराव केळकर विद्यालयातर्फे आयुष शिंदे याचा शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष अमर वार्डे, सीईओ भावना केळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील, सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या वतीने आयुष शिंदे याला दहा हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.