लवकरच माथेरानच्या रस्त्यावर ई रिक्षा धावणार
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
माथेरान हे महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ आहे जिथे दसतुरी नाक्या पुढे कुठल्याही मोटार वाहनाला परवानगी नाही फक्त रुग्णवाहिका व अग्निशमन शमन दलाची गाङी यांनाच परवानगी देण्यात आली असून येथे वाहन म्हणून हात रिक्षा तसेच घोड्यांना वाहन म्हणून मान्यता आहे माणसाने माणसाला ओढणे म्हणजे ब्रिटीशांनी एक प्रकारे लादलेली गुलामगिरी म्हणावी लागेल.

या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तसेच रिक्षा चालंकाना अमानवी प्रथेतुन मुक्ति मिळावी या साठी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी शासन दरबारी हा विषय गेल्या दहा वर्षांपासून लावून धरला राज्य शासन त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी रिक्षा चालकांनी होणारी दमछाक दाखवून दिली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून 12 मे 2022 रोजी रिक्षा चालकाच्या बाजुने निर्णय देऊन ई रिक्षाची चाचणी घेण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार जिल्हा अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सुचने नुसार उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 22 जुलै रोजी माथेरान च्या एमटीङीसी येथे बैठक पार पङली या बैठकीला सर्व खात्याचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

बैठकीत झटपट निर्णय घेऊन आज दि. 27 जुलै 2022 रोजी प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा निर्णय झाला त्या अनुशंगाने ई रिक्षाची चाचणी घेण्यात आली प्रत्यक्ष सहा कंपनीने यात सह भाग नोंदवला पण पाच रिक्षा दाखल झाल्या प्रथम या रिक्षा मधून माथेरानच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे, पनवेल विभागाचे अधिकारी चंद्रकांत पाटील, अजय कराळे, संजय पाटील, प्रदूषण बोर्डाचे सागर किल्लेदार व आर एस कामात आणि संबंधित अधिकारी वर्गाने दसतुरी नाका ते रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवास करून हिरवा कंदील दाखवला त्यानंतर या रिक्षांनी दस्तुरी ते माथेरान तीन फेऱ्या मारल्या कुठल्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माथेरानचे एपीआय शेखर लव्हे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. माथेरानच्या नागरिकांनी ई रिक्षाचे टाळ्या वाजवून स्वागत केले तर विद्यार्थ्यांनी कॅनव्हास वर ई रिक्षाचे चित्र काढून आपला पाठिंबा व्यक्त केला

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे परंतू माथेरानच्या हात रिक्षा चालकांसाठी व्यवसायात बदल करण्याचे स्वातंत्र्य आज मिळाले आहे, आजचा दिवस ख-या अर्थाने सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्या सारखा आहे कारण माथेरानला आज ख-या अर्थाने स्वातंत्र्य आहे ब्रिटिशांच्या जाचक कायद्यातून माथेरान मुक्त होणार आहे अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते सुनील शिंदे यांनी दिली.




















Be First to Comment