सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम शाखा स्थापन करणारे उरण तालुक्यातील संदेश ठाकूर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष (उरण पनवेल )पदी निवड करण्यात आली आहे.

उरण तालुक्यात मनसे पक्ष वाढविण्यात, पक्षाचा विस्तार करण्यात संदेश ठाकूर यांची भूमिका महत्वाची आहे. आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. जिल्हाध्यक्ष निवडीचे नियुक्ती पत्र राज ठाकरे यांनी त्यांना दिले आहे.
संदेश ठाकूर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.













Be First to Comment