१७ मार्चला दास्तान फाटा येथे प्रकल्पग्रस्तांचा रास्ता रोको
सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या गुरुवार दि. १७ मार्च रोजी सिडकोच्या ५२ व्या वर्धापन दिनी लक्ष वेधण्यासाठी १९८४ च्या गौरवशाली लढ्याची सुरुवात झाली त्या उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे.
सिडकोची स्थापना होऊन आज ६२ वर्षे उलटली तरी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली गौरवशाली लढा उभारला होता. त्यात ५ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यावेळी मंजूर झालेले साडेबारा टक्के विकसित भूखंड अद्याप मिळालेले नाहीत. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावेत तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी येत्या गुरुवार दि. १७ मार्च रोजी दास्तान फाटा येथे सिडकोच्या ५२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सकाळी १०.३० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचा इशारा लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी जेएनपीटी प्रशासनाला दिला आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.















Be First to Comment