सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
स्वर्गीय केशवबुवा म्हात्रे संगीत आदरांजली पुरस्कृत श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त शनिवार दि.18/12/2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत श्री भोलानाथ मंदिर-आवरे,तालुका उरण येथे तालुका स्तरीय स्वर्गीय केशवबुवा म्हात्रे संगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2021 असून स्पर्धकांनी, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी अधिक माहितीसाठी तसेच नाव नोंदणीसाठी महेश गावंड -9870261379, सदानंद म्हात्रे -9082495636 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













Be First to Comment