Press "Enter" to skip to content

रेल्वे प्रवाशांसाठी सुचना

रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा 6 तासांसाठी बंद राहणार, रेल्वेची घोषणा..!

सिटी बेल | मुंबई |

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) आजपासून (ता. 15) पुढील 7 दिवस रात्री 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली.

कोरोनानंतर आता रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू झालीय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकीट बुकिंग होत आहे. सध्या मेल, एक्सप्रेस, कोरोना काळात सुरु केलेल्या ट्रेनची संख्या, नव्याने सुरु केलेल्या ट्रेन, आदींची माहिती साॅफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याचे काम सुरू आहे.

आज (ता. 15) मध्यरात्रीपासून 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही प्रणाली रात्री 11:30 ते पहाटे 05:30 पर्यंत बंद असणार आहे. या सहा तासांच्या कालावधीत रेल्वेशी संबंधित डेटा अपडेट करण्यात येणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही सर्व कामे रात्री केली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली दिवसातून 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील 7 दिवस रात्री 6 तासांसाठी रेल्वेचे तिकिट बुकिंग, तिकीट रद्द करणे, ट्रेनची चौकशी करणे, या गोष्टी करता येणार नाहीत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.