Press "Enter" to skip to content

पंचवीस लाखाच्या खंडणी साठी अपहरण झालेल्या दिगंबर चितोडिया याची सुखरूप सुटका

खोपोली पोलीसांची रात्री ची गस्त.. अपहरण करणाऱ्या टोळीचा डाव उध्वस्त !

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

कारच्या नंबर प्लेट ला लागलेला चिखल पोलीसी नजरेत आल्याने अपहरणाचा मोठा डाव उघडकीस आल्याची घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून
वामन मारुती शिंदे (वय39 ), योगेंद्र प्रसाद (वय25 ), दिलीप सत्तन पासवान (वय32), धुरपचंद्र यादव (वय33), संदीप प्रकाश सोनावणे (वय35 सर्व राहणार अंबरनाथ) या अपहरणकर्त्याना कोठडीत बसण्याची पाळी आली आहे.

पंचवीस लाखाच्या खंडणी साठी अपहरण झालेला दिगंबर इंदलसिंग चितोडिया(मुळशी पुणे) याची सुखरूप सुटका झाली आहे.

गुरूवार 30 सप्टेंबर रोजी रात्री खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर व पोलीस अंमलदार स्वागत तांबे आणि राम मासाळ हे शिळफाटा येथे गस्त घालत होते. त्याच दरम्यान MH-04-CT-2597 क्रमांकाची अल्टो कार जात असताना कारच्या नंबर प्लेट वर चिखल लावला असल्याने पोलिसांना संशय आला .कार मध्ये सहा इसम बसले होते. कार थांबवून चौकशी केली असता कार मधील पाच इसम उडवा उडवीची उत्तरे देऊ होते.त्याचवेळी घाबरलेल्या एकाने पोलीस अधिकाऱ्यांना ‘मला वाचवा ‘ अशी विनंती केली असता पोलीसांनी सखोल चौकशी केली असता यातील पाच जणांनी दिगंबर चितोडीया याचे अपहरण करून त्यास दोन दिवस अपहरण करून अंबरनाथ येथे डांबून ठेवुन त्याच्या कुटुंबाकडे 25 लाख खंडणी मागणी केली असल्याचे समजले.

खोपोली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या बाबत पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाणे अपहरण व खंडणी मागणे या गुन्हा अज्ञात आरोपी विरोधात दाखल झाल्याचे समजले. खंडणी आणि जिवितहानी न होता दिगंबर इंदलसिंग चितोडिया(मुळशी पुणे) याची सुटका करणा-या खोपोली
पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार राम मासाळ,स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी अभिनंदन केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.